अमरावतीच्या महादेवखोरी परिसरातील लोकवस्तीत शिरला बिबट्या - अमरावती लेटेस्ट
अमरावती - शहराच्या महादेव खोरी भागातील लोकवस्तीत बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास परिसरातील श्वान भुंकत असल्याने, सकाळी फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या महादेव खोरीत राहणारे रवींद्र वैद्य यांचे या परिसरात एक मोठे फार्म हाऊस आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास या फार्म हाऊस परिसरात बिबट्या शिरला होता. काही वेळ बिबट्या या फार्म हाऊस परिसरातच फेरफटका मारत असल्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. दरम्यान महादेव खोरीत बिबट्या आढळल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.