विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांकडून वाशिम येथील कोविड सेंटरची पाहणी - वाशिम कोरोना अपडेट
वाशिम - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे गुरूवारी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी कोरोना परस्थिती, म्यूकरमायकोसिस रुग्णसंख्या, लसीकरण, कोविड लससाठा, पीएम केअर फंडातून करण्यात आलेली ऑक्सिजन व्यावस्थांची पाहणी केली. यावेळी जिल्हात कोरोनाची तिसरी लाट आली तर जिल्ह्यात काय व्यवस्था आहे, याची माहिती जिल्हाधिकारी एस. षण्मुगराजन, जिल्हा शल्य चिकित्सक रोठोड यांच्याकडून देण्यात आली. यावेळी माजी उर्जा मंत्री बावनकुळे, माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी उपस्थित होते.