दिवाळी पाडव्यानिमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात रंगला लावणीचा कार्यक्रम - Diwali Padva latest news
दिवाळी पाडव्यानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात लावण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी लावण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिक मोठया संख्येने येत असतात. मात्र गेल्या 2 वर्षीपासून कोरोना संसर्गजन्य आजारामुळे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने रंगणारा हा लावण्यांचा फड बालगंधर्व रंगमंचावर रंगला नव्हता.