Mumbai Crime : कुरार पोलिसांनी ४ वर्ष मुलाच्या अपहरणाची केली उकल - मुंबई पोलीस झोन १२
मुंबई - मालाड पूर्व कुरार पोलिसांनी ४ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा उलगडा केला (Mumbai Police) असून, एका आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलीस झोन १२ चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, '२१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपींनी ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. यानंतर कुरार पोलिसांची ४ पथके आरोपींना पकडण्यासाठी कार्यरत होती.' तांत्रिक पुराव्यांवरून आरोपी चार वर्षाच्या चिमुकलीला घेऊन आंध्र प्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या कुरार पोलिसांच्या पथकाने आरोपीला आंध्र प्रदेशातून एका ४ वर्षाच्या चिमुकल्यासह अटक करून मुंबईत आणले आहे. पोलिसांनी मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन केले आहे. पैशासाठी मुलाचे अपहरण केल्याचे आरोपीच्या चौकशीत निष्पन्न झाले.