Kolhapur Drone Video: पाहा कोल्हा'पूर', पंचगंगेचे रौद्ररूप - कोल्हापूर पाऊस अपडेट
कोल्हापूर - गेल्या चोवीस तासांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याने सध्या कोल्हापुरात महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरायला सुरुवात झाली आहे. त्याचे भीषण आणि वास्तव दाखवणारी दृश्य ड्रोन च्या माध्यमातून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने यांनी टिपली आहेत. पंचगंगा नदीचे हे रौद्र रूप पाहून कोणाच्याही तोंडातून बाप रे! केवढा हा पूर.... असे निघाल्या शिवाय राहणार नाही.
Last Updated : Jul 23, 2021, 2:29 PM IST