VIDEO : जालना महावितरणसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन - जालना महावितरण
जालना - पूर्वसूचना न देता शेतकऱ्याच्या कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ जालन्यातील महावितरणच्या (Jalna MSEB Office) मुख्य कार्यालयासमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं धरणे आंदोलन (Swabhimani Shetkari Sanghatna Protest) केले. या आंदोलनात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी (Farmers involved in Protest) सहभागी झाले होते. शेतकऱ्यांकडे असलेल्या विज पंपांच्या थकीत वीजबिलापोटी महावितरण कडून जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे विज कनेक्शन तोडण्यात आले. मात्र, हे वीज कनेक्शन तोडण्याआधी शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस महावितरणकडून देण्यात आली नाही. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे.आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.