Farm Laws Repeal : उशीरा का होईना, निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार - जयंत पाटील
मुंबई : जल संपदा मंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी कृषी कायदे(FarmLaws) मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. २६ नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला(Farmer Protest) एक वर्ष होईल. जवळपास ६३१ शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालणारे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुरुवातीपासून या आंदोलनाला पाठिंबा होता. पवार साहेबांनी पंतप्रधानांना अनेकदा कायदे मागे घेण्याचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं. मागच्या पोट निवडणुकांचे निकाल, लखीमपूर येथील घटना, महागाई, येणाऱ्या निवडणुका या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नाईलाजाने केंद्राने हा निर्णय घेतलेला दिसतोय. लवकर निर्णय घेतला असता, तर ६३१ प्राण वाचले असते. उशीर का होईना केंद्राने निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.