MPSC आयोगाकडून जाहीर झालेल्या उत्तरसूचीत चुकीची उत्तरे, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष - एमपीएससी उत्तर सूची घोळ
पुणे - सप्टेंबर 2021 मध्ये पी.एस.आय आणि एस.टी.आयची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेची पहिली उत्तर सूची जाहीर केल्यावर त्यात काही चुकीची उत्तरे आढळून आली होती. यामुळे एमपीएससी आयोगाने दुसरी उत्तरसूची जाहीर केली. या उत्तरसुचीमध्ये देखील चुका आढळल्याने विद्यार्थ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे एमपीएससीच्या इतिहासात पहिल्यांदाच तिसरी उत्तरसूचीसुद्धा प्रसिद्ध करावी लागली. मात्र, ती देखील सदोष आहे. त्यातील काही बरोबर प्रश्न रद्द करण्यात आले. स्वतःची चुकी लपवण्यासाठी आयोगाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या गुणांवर त्याचा परिणाम झाला आणि 3 ते 4 हजार मुले 0.25 ते 3 गुणांनी MPSC च्या चुकीमुळे नापास झाले, असा आरोप विद्यार्थी करत आहेत. यामुळे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षेतून बाहेर फेकले गेले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी न्यायालयात दाद मागितली असून अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष आहे.