मराठी कलाकार अभिजित खांडकेकर यांच्या घरी श्रीची प्रतिष्ठापणा - actor abhijjit khandkekar
नाशिक - मराठी कलाकार अभिजित खांडकेकर यांच्या नाशिकच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मालिकेतील कामाच्या धावपळीतून दरवर्षी अभिजित खांडकेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री सुखदा खांडकेकर गणेश उत्सवकाळात नाशिकला येऊन सहपरिवार गणरायाची आराधना करतात. गणेशाच आगमन कधी होणार यांची अतुरतेने वाट बघत असल्याचं अभिजित सांगतो. दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिजितच्या घरी शाडू मातीची गणेश मूर्ती विराजमान झाली असून इको फ्रेंडली देखावा त्याने साकारला आहे.