यवतमाळमध्ये तान्हा पोळ्याला चिमुकल्यानी दिल्या झडत्या - bailpola festival
यवतमाळ - कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी प्रशासनाने निर्बंध कायम ठेवले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शेतकर्यांना यंदाही पोळा घरीच साजरा करावा लागला. वर्षभर शेतकर्यांबरोबर बैल शेतात राबतात. बैलांप्रती कृतज्ञता पोळा सणाला शेतकरी व्यक्त करतात. चिमुकले मुलेही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक पोळा भरला नाही. तान्हा पोळ्यालाही तेच दृश्य बघायला मिळाले. तान्हा पोळा भरू न शकल्याने चिमुकले मुले उदास झाली. काही मुलांनी झडत्या म्हणून तान्हा पोळ्यात रंगत आणली. मुलांनी मातीच्या बैलाला घरोघरी घेऊन गेले. महिलांनी बैलांची पूजा करून बोजाराही दिला.