Woman Stole Jewelry Nashik : महिलेने असा लंपास केला सोन्याच्या दागिन्यांचा बाॅक्स, बघा CCTV व्हिडिओ - 87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स चोरी
नाशिक : सराफ बाजारात काल (बुधवारी दि.9) दुपारी सोने खरेदीसाठी आलेल्या महिलांनी चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. भागीरथी ज्वेलर्सच्या दुकानात (Theft at Bhagirathi Jewelers shop) लहान मुलीसोबत आलेल्या तीन महीलांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स लांबविला (Three women stole box gold jewelry)आहे. तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास करत पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद (Theft incident captured on CCTV) झाला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, दुकानातील एका वयाेवृद्ध ग्राहकाला त्यांनी पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर दंडगव्हाळ यांना फाेन आल्याने ते माेबाईलवर बाेलत हाेते. हीच संधी साधून तीन महिलांपैकी एकीने व तिच्या साेबतच्या लहान मुलीने हातातील हँन्डपर्स काउंटरवर ठेवली.तसेच दंडगव्हाळ यांची नजर चुकवून त्यांच्या हातासमाेरील ड्राॅवरमधून 87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स ठेवलेली बाँक्स (Theft gold tops weighing 87 grams) हाताेहात लांबविली. दरम्यान यानंतर या महिला व मुलगी दुकानातून निघताच रिक्षात बसून पंचवटीकडे गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या महिला कोणासही आढळल्यास सरकारवाडा पाेलिसांशी व सराफ असोसिएशनकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 10, 2022, 1:08 PM IST