मालेगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; घरात साचले पावसाचे पाणी - Washim District Latest
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यासह ग्रामीण भागात धुवांधार पाऊस झाला आहे. मालेगाव शहरात सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यांना झोडपून काढले आहे. या वादळी वाऱ्यासह पावसाचा सर्वाधिक फटका नारायण अहिर यांना बसला आहे. या अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घरावरील तीन पत्रे उडून गेले आहेत. घरात पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे घरातील अन्नधान्य, संसार उपयुक्त साहित्य, वस्तू पाण्यात खराब झाल्या आहेत. तर शेजारील गोठ्याचे नुकसान झाले असल्याने जनावर उघड्यावर आले आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे मालेगाव शहरातील अनेक भागातील घरावरील पत्रे उडून गेली आहेत, तर कुठे झाडे रस्त्यावर पडली आहेत.