महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पूरग्रस्तांचा आक्रोश : काडी-काडी जमा करुन गोळा केलेला संसार पुरात उद्ध्वस्त - Heavy rains in chiplun

By

Published : Jul 24, 2021, 4:38 PM IST

चिपळूण शहराला जवळपास 30 तासांहून अधिक काळ पुराच्या पाण्याचा वेढा होता. आता पूर ओसरला असला तरी त्याच्या खुणांवरून हा पूर किती भयानक होता ते दिसून येत आहे. शहरात जवळपास 10 ते 15 फूट पाणी साचलं होतं, घरं या पुरात बुडाली तर अनेक बिल्डिंगच्या ग्राउंडचा भाग बुडून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं होतं, पाण्याचा वेग एवढ्या वेगाने वाढला की लोकांना बाहेर पडायला मार्गच मिळाला नाही, अनेकजण घराच्या छपरांवर चढून मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते. घरातील सामान वाहून गेलं, धान्य, कपडे सगळंच गेलं. जेवणासाठी धान्यही राहिलं नाही, आम्हाला पाणी आणि धान्य द्या, असा आक्रोश पहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण शहरातील रामतीर्थ परिसरातील सुनील पवार यांचंही मोठं नुकसान झालं आहे. होतं नव्हतं ते सर्व पुरात गेलं या परिस्थितीचा आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details