कंगना विरुद्ध महापालिका, कार्यालयाचे बांधकाम पाडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू - कंगना रणौत मुंबई उच्च न्यायालय सुनावणी
कंगना रणौत मालमत्ता कारवाई प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. कंगनाचे वकील अॅड. रिझवान यांनी युक्तिवाद सुरू केला आहे. कंगनाविरुद्धची कारवाई बेकायदेशीर आहे. महापालिकेने कारवाईनंतर या मालमत्तेची पाहणी केली. 2017 साली कंगनाने ही मालमत्ता विकत घेतली. 2018 साली कंगनाने या मालमत्तेची दुरुस्ती करायची परवानगी महापालिकेकडे मागितली. 2019 साली महापालिकेने ही परवानगी दिली. कंगनाने प्रशासनावर केलेल्या टीकेमुळे महापालिकेने 2020मध्ये ही कारवाई केली. कंगनाच्या जीवाला धोका आहे. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाला विशेष संरक्षण द्यावे, अशी मागणी तिच्या वकिलांनी केली आहे.