VIDEO : आरोग्य विभागाच्या परीक्षा 24 आणि 31 ऑक्टोबरला - rajesh tope announce health dept exam date
जालना - आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या नवीन तारखा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्या आहे. २४ ऑक्टोबरला गट क ची परीक्षा होणार असून ३१ ऑक्टोबरला ड गटासाठी परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. न्यासा संस्थेच्या गोंधळामुळे याआधी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. त्यामुळे आरोग्य विभागाला पुन्हा नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्या लागल्या आहे. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा नव्याने तारखा जाहीर केल्यानं परीक्षार्थीमध्ये आनंदाचं वातावरण पसरले आहे.
Last Updated : Sep 27, 2021, 9:11 PM IST