महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amravati violence गुन्हा करणाऱ्या एकालाही सोडणार नाही - पालकमंत्री यशोमती ठाकूर - अमरावतीत संचारबंदी

By

Published : Nov 15, 2021, 4:52 PM IST

अमरावती - त्रिपुरा हिंसाचाराचे हिंसक पडसाद (tripura violence) अमरावतीत देखील उमटले (Amravati violence) होते. अमरावती बंद (amravati bandh) दरम्यान भाजपच्या वतीने तोडफोड, जाळपोळ तसेच, पोलिसांना मारहाण केल्याने अमरावतीत आज सकाळपासून भाजप नेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरू आहे. तर, अमरावतीत कालपासून सर्वत्र शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागले नाही, अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur) यांनी दिली. तर, अमरावतीत संचारबंदी असल्याने 2 ते 4 या वेळेत नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच, लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल, अशी अपेक्षा देखील यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. तर, अमरावती शहरातील 4 ते 5 हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गुन्हा करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील यशोमती ठाकूर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details