फडणवीस - मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपाला कारणीभूत ठरणाऱ्या 'त्या' जमिनीचा पाहा ग्राउंड रिपोर्ट - अंडरवर्ल्ड संबंध नवाब मलिक
मुंबई - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तींकडून जमीन विकत घेतली, असा आरोप फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत केला. नवाब मलिक यांनी कुर्ला एलबीएस मार्ग येथे असलेली गोवावाला कंपाउंडची जवळपास तीन एकर जमीन 1996 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात आरोपी असलेल्या सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल याच्याकडून खरेदी केली असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्या जागेवरून देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात आरोप - प्रत्यारोप होत आहेत, त्या संपूर्ण जागेचा 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने आढावा घेतला.