इलेक्ट्रॉनिक स्कूटरवर स्वार होत गौराईंनी दिला इंधन बचतीचा संदेश - ganeshotsav 2021
जालना - येथील वडीगोद्री येथे राहणाऱ्या दीपक ठाकूर यांच्या घरी इलेक्ट्रॉनिक स्कूटीवर बसून गौराईचं आगमन झालंय. ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी गौरींचा हा आकर्षक देखावा सादर केला आहे. यावर्षी पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे इंधन दरवाढीचा देशातील सर्वच नागरिकांना फटका बसला. केंद्र सरकारला इंधन दरवाढ कमी करण्याची सदबुद्धी देवो, यासाठी गौरींचा इलेक्ट्रॉनिक स्कूटीवरील देखावा तयार केल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांच्या कुटुंबीयानी दिली. गौरींचा हा देखावा परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Last Updated : Sep 14, 2021, 4:40 PM IST