VIDEO : मेळघाटात वाघाचा मुक्तसंचार, संपूर्ण व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद - वाघ
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वैराट गावाजवळ पर्यटकांना एका वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा पट्टेदार वाघ थेट गावाजवळ आला होता. यावेळी रस्त्यावर चालत असतानाचा व्हिडिओ पर्यटनासाठी आलेल्या संगीता सोळंके यांनी काढला आहे. बऱ्याच वेळानंतर तो वाघ रस्त्यावरुन पुन्हा जंगलात गेला. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.