महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

रिक्षाचालकांना 1500 ऐवजी 5 हजार रुपये देण्यात यावे - माजी मंत्री कृपाशंकर सिंग - दहिसरमधील रिक्षाचालकांना खाद्य सामग्रीचे वाटप

By

Published : Jun 14, 2021, 9:40 AM IST

Updated : Jun 14, 2021, 11:29 AM IST

मुंबई - शहरातील दहिसर पूर्व मध्ये लॉकडाऊनमध्ये संकटात सापडलेल्या ऑटोरिक्षा चालकांच्या मदतीसाठी 'परिश्रम' संस्थेच्या माध्यमातून खाद्य सामग्री वाटण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सरकारने प्रत्येक ऑटो रिक्षा चालकांना पाच हजार रुपये द्यावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. तसेच यावेळी कृपाशंकर सिंह म्हणाले की, 'आरटीओमध्ये रिक्षाचालकांचे सगळे कागदपत्र उपलब्ध असतांना, रिक्षाचालकांना रांगेमध्ये उभे करून त्यांना अपमानित का केले जात आहे?' तसेच त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री व मंत्री अनिल परब यांना सुद्धा पत्रव्यवहारही केला आहे.
Last Updated : Jun 14, 2021, 11:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details