VIDEO : नाशिकमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी महिलांचा पिंक मेला - etv bharat live
नाशिक - ऑक्टोबर महिना हा जागतिक ब्रेस्ट कॅन्सर महिना म्हणून पाळला जातो. आणि याच निमित्ताने नाशिकच्या मानवता एच सी जी मानवता केअर सेंटर आणि वॉव ग्रुप ने एकत्रित येत महिलांसाठी खास पिंक मेलाचे आयोजन करण्यात आले होते. या पिंक मेला मध्ये खास महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ,स्पर्धा तसेच दिवाळी निमित्ताने वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते. सध्या भारतात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतं चालले आहे. त्यात कमी वयाच्या महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जनजागृती ही भीतीच्या वातावरणात होऊ यासाठी महिलांसाठी खास पिंक मेला आयोजित केल्याचे प्रसिध्द कॅन्सर रोग तज्ञ डॉ राज नगरकर यांनी सांगितले.