VIDEO : मेळघाटमधील सर्वात मोठ्या नदीला पूर; 35 गावांचा संपर्क तुटला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
अमरावतीमध्ये मागील तीन दिवसांपासून विदर्भात पावसाची संततधार सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात देखील पाऊस धो-धो बरसत असल्याने अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. तर तिकडे मेळघाटमध्ये पावसाची अतिवृष्टी कायम सुरू असल्याने सर्वात मोठ्या असलेल्या सिपना नदीला देखील मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यात आता नदीला मोठा पूर आला आहे आणि पुराचे पाणी हे पूलावरून वाहू लागल्याने मेळघाटातील तबल 35 गावांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला आहे. तसेच या पुरामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. मध्यरात्रीपासून मेळघाटात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सिपना नदीसह मेळघाटमधील अनेक छोट्या-मोठ्या नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहे. दरम्यान पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
Last Updated : Jul 22, 2021, 10:31 PM IST