महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पुण्यात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल - PUNE TOP NEWS

By

Published : May 12, 2021, 9:08 AM IST

पुणे - शहरात पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस बुधवारी मध्यरात्री दाखल झाली आहे. 55 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले 4 टँकर पुण्यातल्या लोणी स्टेशनवर बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. ओरिसातल्या अंगुल येथून ही ऑक्सिजन एक्सप्रेस पुण्यातल्या लोणी येथे दाखल झाली आहे. या एक्सप्रेसने 37 तासांत तब्बल 1हजार725 किलोमीटर अंतर कापले आहे. यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. आणि रो रो सेवेद्वारे हे ऑक्सिजन टँकर आणण्यात आले. महाराष्ट्रात दाखल होणारी ही पाचवी ऑक्सिजन एक्सप्रेस आहे. तर पुण्यासाठी पहिलीच ऑक्सिजन एक्सप्रेस आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेससाठी लोणी रेल्वे स्थानकावर नव्याने रॅम्प तयार करण्यात आला होता. ही ऑक्सिजन एक्सप्रेस लोणीत दाखल झाली त्यावेळी रेल्वे प्रशासनाने अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details