विशेष : कासवाला बसवला कृत्रिम पाय! कोल्हापूरात यशस्वी प्रयोग
कोल्हापूर - माणसांना कृत्रिम पाय आणि हात लावलेले आपण सर्वांनीच ऐकले आणि पाहिले सुद्धा आहे. मात्र कोल्हापूरात चक्क कासवाला कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कासव 'त्या' कृत्रिम पायाचा वापर सुद्धा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर वनवृत्ताचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्यामुळे या अपंग कासवाला एकप्रकारे संजीवनी मिळाली आहे. वेंगुर्ला येथे मासेमारी करत असताना ऑलिव्ह रिडेल जातीच्या कासवाच्या दोन्ही पायांना जखम झाली होती. त्याला कृत्रिम पाय बसवण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरात यशस्वी झाली आहे.