Schools Reopen In Mumbai : मुंबईत अखेर शाळा झाल्या सुरू, रिकामी बाक भरली - Pune Vidyabhavan School
मुंबई : कोरोना महामारी आल्यापासून मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा बंद (Schools Closed In Maharashtra) करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा (Schools Reopened In Mumbai) उघडण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून मुंबईतील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासूनच मुलांमध्ये शाळेत जाण्याचा उत्साह दिसत होता. घाटकोपर येथील विद्याभवन शाळेमध्ये मुलांचे स्वागत करण्यासाठी शिक्षक स्वतः हजर होते. मुलांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. तब्बल पावणे दोन वर्षानंतर सर्व मुले आपापल्या मित्रांना शिक्षकांना भेटणार आहेत. आज शाळा सुरू झाल्या असून, मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. घाटकोपर मधील पुणे विद्याभवन शाळेतून (Pune Vidyabhavan School Ghatkopar) आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.
Last Updated : Dec 15, 2021, 12:43 PM IST