बॉम्ब फोडा पण धूर होऊ देऊ नका; मुख्यमंत्र्यांचा टोला - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बारामती : दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. बॉम्ब फोडा, पण धूर काढू नका. कारण कोरोना अजून गेला नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मी कधी डगमगलो नाही, आणि पुढे कधी डगमगणार नाही. विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करतात. राजकारणात अनेकांचं एकमेकांशी पटत नाही, त्यामुळे चांगल्या कामात अथडळा आणणं ही आपली संस्कृती नाही. आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायत ते बघायला हवं. बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.