46 देश फिरणारा, गांधी विचारांचा प्रचारक; पाहा, नितीन सोनावणे या तरुणाचा लक्षणीय प्रवास... - नितीन सोनावणे विशेष मुलाखत
हैदराबाद - राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अहमदनगरच्या नितीन सोनावणे या तरुणाने तब्बल 46 देश तसेच 25,000 हजार किलोमीटरचा प्रवास केला. जगभरातील नागरिकांमध्ये गांधी विचार रुजवण्याचे त्यांचे काम लक्षणीय आहे. सध्या राजस्थानमधील अजमेर येथे असलेला हा तरुण तेथील विद्यार्थ्यांना सत्य आणि अहिंसेचा संदेश देत आहेत. गांधी हे अनंत आणि अनादी आहे, असे मत त्याने यावेळेस व्यक्त केले.