EXCLUSIVE : अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात, 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी अंबाबाईचे खास दर्शन
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात घटस्थापना आणि तोफेच्या सलामीने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदाचा नवरात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांविना साजरा होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट असल्याचे पहायला मिळत आहे.