बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड माफियांचा हस्तक्षेप, माजी पोलीस महासंचालक डी.जी. पसरीचा... - डीजी पसरीचा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला मीडियाने खुप वजन दिले आहे. सध्या वेगवेगळ्या वादांमुळे मुंबई पोलिसांच्या तपासात अडथळा येत आहे. यात राजकारण आल्याने पोलिसांवर दबाव आला आहे. सुशांतसिंह संदर्भात कोण बरोबर आहे? कोण चुकीचे आहे? हे तपासातून समोर येईल. बिहार पोलिसांना त्यांच्याकडे दाखल झालेला गुन्हा हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करावाच लागेल कारण ही घटना मुंबईत घडली असून मुंबई पोलीस याचा तपास करीत आहेत, असे मत माजी मुंबई पोलीस आयुक्त व माजी पोलीस महासंचालक डीजी पसरीचा यांनी व्यक्त केले.