लोकांना भुलवणाऱ्या घोषणा, जातीयवादी मांडणी करून निवडणूका जिंकता येत नाहीत - अतुल भातखलकर - BJP is the largest party in Bihar
मुंबई - बिहारमधील निकाल म्हणजे नरेंद्र मोदी यांची लाट अजूनही कायम आहे, याचाच पुरावा आहे. विकासाला व सुशासनाला लोक मत देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोकांना भुलवणाऱ्या घोषणा, जातीयवादी मांडणी करून निवडणूक जिंकता येत नाही, हेच आजच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे. यापुढेही भारतीय जनता पक्षाची घोडदौड अशी सुरू राहील, असे भाजप नेते व प्रवक्ते अतुल भातखलकर यांनी बिहार निवडणूक निकाल स्पष्ट होत असताना म्हटले आहे.