विद्यार्थ्यांचे आंदोलन कोणीतरी पुरस्कृत केले आहे का, याचा तपास व्हावा- शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी
पुणे - परीक्षा ऑनलाइन घ्यावी, या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक ( students agitation for online exam ) झाले आहेत. मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर ( students agitation in Maharashtra ) उतरले आहेत. हे जे विद्यार्थी आंदोलन करत आहे ते अशैक्षणिक आहे. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन कोणीतरी पुरस्कृत केले आहे का, याच तपास ( Educationist demand to probe on students agitation ) केला पाहिजे. हे आंदोलन सरकारला पुढे जाऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायचा असेल त्याच्यासाठी वातावरणीय निर्मितीसाठी असू शकते, असे मत शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी ( Educationist Dhananjay Kulkarni on students agitation ) व्यक्त केले आहे.