VIDEO : नाट्यगृह सुरू झाल्याने नाशिकचे कलाकार सुखावले - etv bharat maharshtra
नाशिक - महाराष्ट्र्र राज्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच बहुतांश नागरिकांनी घेतलेली कोविड 19चे डोस यामुळे सरकारने कोरोनाचे नियम शिथिल केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात शुक्रवारपासून सिनेमागृह,नाट्यगृह सुरू होतं आहे. मात्र, सरकारने सिनेमागृह आणि नाट्यगृहात 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे. प्रेक्षकसंख्या कमी असल्याने नाटकाचे प्रयोग परवडतील का ? जादा दराने प्रेक्षक तिकीट घेतील का ? असे अनेक प्रश्न कलाकारांना पडले आहेत. मात्र, नाट्यगृह सुरू झाल्याचा आनंद देखील कलाकारांना झाला आहे. याचबद्दल नाशिकच्या महाकवी कालिदास कालामंदिर येथे कलाकारांशी बातचीत केलीय नाशिकच्या ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधींनी...