VIDEO : कोल्हापूरमधील प्रयाग चिखलीत NDRF तैनात, गाव खाली करण्याच्या सूचना - Prayag Chikhali in Kolhapur
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले. सायंकाळी पाच वाजता एनडीआरएफचे पथक प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या गावात तैनात केले आहे. एनडीआरएफ पथकाकडून ग्रामस्थांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करत एनडीआरएफच्या पथकाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पंचगंगा नदीची पातळी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत असून कोणत्याही क्षणी आंबेवाडी आणि प्रयाग चिखली गावाला पुराचा वेढा पडू शकतो. संपूर्ण गावात एनडीआरफच्या पथकाने फेरफटका मारत नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Last Updated : Jul 22, 2021, 7:28 PM IST