VIDEO : घाटात पून्हा भिररर होणार..पण ही भिर होताना नियमावलीच वापर करू - खासदार अमोल कोल्हे - खासदार अमोल कोल्हे बैलगाडी शर्यत मत
पुणे :- गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी (Bullock Cart Race in Mharashtra) गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बैलगाडा शर्यतीवर जी बंदी होती ती आज उठवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच मी स्वागत करतो. आत्ता घाटात पून्हा भिररर होणार पण ही भिर होताना सर्व नियमांचं पालन करूनच ही बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) भरवायची आहे. हा अंतिम विजय नाही तर 2 खंडपीठाने हा दिलेला निर्णय आहे. जोपर्यंत 5 खंडपीठासमोर याची अंतिम सुनावणी होत नाही. तामिळनाडू, कर्नाटक , महाराष्ट्र या सगळ्या राज्यांची अंतिम सुनावणी या 5 खंडपीठासमोर होणार आहे.आणि त्यासाठीची तयारी ही सुरूच राहणार आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी देखील कटिबद्ध आहे.आणि महाराष्ट्र सरकार देखील कटिबद्ध आहे.असं देखील यावेळी कोल्हे म्हणाले.