Video : उगाच पलटन वाढू नका, दोनच अपत्यांवर थांबा - अजित पवार - उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला
बारामती - शरद पवार हे पन्नास वर्षांपूर्वी एकाच अपत्त्यावर थांबले. मी असे म्हणत नाही की एकाच अपत्यावर थांबा. किमान दोन अपत्यांवर थांबले पाहिजे. उगाच पलटन वाढू नका, असा कुटुंब नियोजनाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलत असताना दिला. अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते. वढाणे येथील रसिकलाल फाउंडेशनच्यावतीने जानाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलावात पाणी सोडण्याचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, की 50 वर्षांपूर्वी पवार साहेब एका अपत्यावर थांबले. मी म्हणणार नाही की तुम्ही एकावर थांबा, पण उगाच पलटन वाढू नका, दोघांवर थांबा आणि कुटुंब नियोजन करा, असा सल्ला अजित पवारांनी दिला.