वाढत्या महागाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन - वाशिम लेटेस्ट न्यूज
वाशिम : बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने 21 जून रोजी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे गॅस, डिझेल, पेट्रोल व जीवनाश्यक वस्तूंच्या दरामध्ये झालेल्या वाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी लोकशाही मार्गाने राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, शहराध्यक्ष अनिल घोले, सल्लागार दत्तराव गोटे, प्राध्यापक सुभाष अंभोरे, सचिव दिलीप भगत, जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत, चरण गोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.