नवरात्रीच्या सातव्या माळेला विठ्ठल-रुक्मिणीला सुरेख अलंकाराचा साज - विठ्ठल-रुक्मिणीला सुरेख अलंकाराचा साज
पंढरपूर (सोलापूर) - नवरात्री निमित्ताने पंढरीच्या विठुरायाला वेगवेगळ्या वेशभुषा आणि अलंकारांनी सजवण्यात येत आहे. रुक्मिणी मातेला करण्यात येणाऱ्या सजावटीने तिचे रुप अधिकच सुरेख दिसून येत आहे. मंगळवारी सातव्या माळे निमित्त श्री.विठ्ठल व रुक्मिणीमातेस पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी दिसत होते. तसेच श्री. रुक्मिणीमातेस महालक्ष्मीदेवी पोशाख श्री.व्यंकटेशास वामन अवतार श्री.महालक्ष्मीमातेस तुळजा भवानी देवी पोशाख करण्यात आला होता. त्या सुंदर रुपाचे ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी खास व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन
Last Updated : Oct 13, 2021, 2:21 PM IST