महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

निर्णय योग्य पण आरोग्य व्यवस्था सक्षम करा, होम आयसोलेशनच्या निर्णयावर पुणेकरांची प्रतिक्रिया - होम आयसोलेशन बद्दल बातमी

By

Published : May 25, 2021, 8:10 PM IST

पुणे - आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी पुण्यासह 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशन बंद केले आहे. या निर्णयाचे काही पुणेकरांनी स्वागत केले आहे, तर काहींनी पहिले आरोग्य यंत्रणा सक्षम करा मगच अशापद्धतीचे निर्णय घ्या, असे सांगितले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने काही वाटत नाही आहे, पण जर दुसऱ्या लाटेप्रमाणे दरोरोज 4000 रुग्णसंख्या वाढली तर या रुग्णांना ठेवणार कुठे असा सवाल ही काही पुणेकरांनी केला आहे. या निर्णयाने कोरोना स्प्रेड होणार नाही, असेही यावेळी काहींनी सांगितले आहे. एकूणच राज्य सरकारचा हा निर्णय योग्य की अयोग्य यावर पुणेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details