CORONA: अंत पाहू नका..! नाहीतर धारावीकरांचाही उद्रेक होईल - कोरोना मुंबई बातमी
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच या विषाणूने धारावीमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळे धारावीतील अनेक भाग सील करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी या ठिकाणी योग्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा कोरोना विषाणूचा मोठ्या प्रादुर्भाव निर्माण होऊ, शकतो. तसेच या गैरसोयीमुळे धारवीकरांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो अशी चिंता धारावी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केली आहे.