पीक कर्जासाठी गर्दी; आरोग्य विभागाकडून बँकेबाहेर अँटीजेन-आरटीपीसीआर चाचणी - वाशिम कोरोना लेटेस्ट
वाशिम : कोरोनाच्या संकटामुळे वाशिम जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. बँकेला सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. मात्र खरीप हंगाम जवळ आल्यामुळे पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची एकच गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने बँकेवर पथक पाठवून तिथे आलेल्या शेतकऱ्यांची अँटीजन तसेच आरटीपीसीआर चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आज मंगरुळपीर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शेतकऱ्यांसेबत इतर नागरिकांनी एकच गर्दी केली असल्याने, सोशल डिस्टडिस्टनसींचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा बँकेवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.