Ganeshotsav 2021 : पुण्यातील महात्मा फुले मंडईत पुणेकरांची गर्दी - Crowd of Punekars at Mahatma Phule Mandai in Pune
पुणे - आवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील बाजारपेठ सजली आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पूजासाहित्याने आणि फुलांनी बाजारपेठ सजली आहे. बाप्पाच्या लाडक्या दूर्वा, जास्वंदांच्या फुलांसह नारळ, शमीची पाने, विड्याची पाने, आघाडा-केवडा यांची खरेदी करण्यासाठी गुरूवारी सकाळपासूनच महात्मा फुले मंडईत पुणेकरांनी गर्दी केली आहे. गणपती बाप्पाचं स्वागत तसेच सामान घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकरांना कोरोनाच्या नियमांचे विसर पडलेला पाहण्यास मिळतो. पुण्यातील महात्मा फुले मंडईतील आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने पाहूया.