विविध समस्या घेऊन जनता अजित पवारांच्या दरबारात - बारामती लेटेस्ट न्यूज
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. आज (रविवार) त्यांचा विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार सुरू आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यापासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. परंतु मागील शनिवारपासून तो पुन्हा भरवण्यात येत आहे. अजित पवारांना भेटून गाऱ्हाणे मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या मतदार संघातील नागरिकांना त्यांच्या विविध कामासाठी पुणे-मुंबईत भेटायला यावे लागू नये, म्हणून अजित पवार स्वतः नागरिकांना भेटत असतात. या जनता दरबारावेळी विविध खात्यांचे शासकीय अधिकारीही उपस्थित असतात. नागरिकांचे ज्या विभागाकडे काम आहे, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांचे निवेदन देऊन, तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. आजच्या जनता दरबारात अजित पवारांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या.