काँग्रेस १११ रुग्णवाहिका देणार, राज्यात वाटप करणार ६१ लाख मास्क - नाना पटोले - Ashokrao Chavan, Congress
मुंबई - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने विविध समाजोपयोगी उपक्रमांची सुरुवात केला. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्ष आपल्या आमदार निधीतून १११ रुग्णवाहिका देणार आहे. या संदर्भातील पत्रे आमदारांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. तसेच राज्यभरात ६१ लाख मास्कचे वाटप केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.
Last Updated : May 23, 2021, 12:09 PM IST