VIDEO : कॉंग्रेसने कंगनाला (kangana ranaut) पाठवली इतिहासाची पुस्तके - काँग्रेसने कंगनाला पाठवली इतिहासाची पुस्तके
ठाणे : अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंगना रणौतला इतिहासाची पुस्तके पोस्टाने पाठवली आहेत. अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) ने 1947 ला भारताला मिळालेले स्वातंत्र्य नसून ती भीक होती. असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी त्याचा निषेध करण्यात आला. कंगनाला दिलेला पुरस्कार परत घेण्याची तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील अनेक ठिकाणी मागणी झाली. ठाण्यात काँग्रेसच्या वतीने कंगना राणावतला इतिहासाची पुस्तके पोस्टाने पाठवण्यात आली आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना रणौत इतिहासाच्या तासाला दांडी मारल्याने ती इतिहास विसरली आहे. म्हणून तिला आम्ही इतिहासाचे पुस्तक पाठवत आहोत असे सांगत को काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिला पुस्तके पाठवली. त्याचबरोबर कंगनाला दिलेला पुरस्कार परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.