काँग्रेस कार्यकर्त्यांना दु:ख अनावर; राजीव सातवांच्या आठवणीने गहिवरले ग्रामस्थ - काँग्रसे कार्यकर्त्यांना दुख अनावर
हिंगोली- काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. याची माहिती मिळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर दुखाचा डौंगर कोसळला. अनेक कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडून राजीव सातव यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केला. राजीव सातव यांच्या निधनाने पक्षाचे नुकसान झाले आहे. ते आमचै नेते नाहीतर ते भाऊ होते, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.