धमकी देऊ नका, आम्ही एकच अशी झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही - उद्धव ठाकरे - आमदार प्रसाद लाड
मुंबई - "वेळ आल्यास शिवसेनाभवन फोडू" अशा आशयाचे चिथावणीखोर वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केले होते. भारतीय जनता पक्षाचे कार्यालय माहीममध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना वाटते की, भाजपाचे कार्यकर्ते शिवसेना भवन फोडतेत की काय, जर वेळ आली, तर तेही करू' असे ते म्हणाले होते. या वक्तव्याचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी देखील म्हाडाच्या कार्यक्रमात भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. बीडीडी चाळीच्या पूनर्विकास कार्यक्राच्या उद्घटनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, की आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डायलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता. पण, अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत, यापुढेही देऊ. आम्हाला धमकी देऊ नका, आम्ही एकच अशी झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.