पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बर्निंग कारचा थरार - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार जळाली
पिंपरी-चिंचवड - पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मोटारीने अचानक पेट घेतला. या अपघातात मोटार जळून खाक झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक मोटारीमधून धूर येत होता. मोटार बाजूला घेतली असता मोटारीला अचानक आग लागली. मोटारीत तीन जण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना कामशेत बोगद्याजवळ घडली असून घटनेची माहिती मिळताच आय. आर. बीच्या अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आणली. या घटनेत मोटार जळून खाक झाली आहे. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती. मोटारीतील शेख कुटुंब हे सुखरूप आहे.