अहमदनगरमध्ये पाहण्यास मिळाला बर्निंग कारचा थरार - mumbai
अहमदनगर - जिल्ह्यातील शिबलापूर - संगमनेर मार्गावर द बर्निंग कारचा गुरुवारी रात्री थरार पाहायला मिळाला. शिबलापूर ते गोसावी फाट्या दरम्यान फोर्ड कंपनीच्या चार चाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली आहे. भर रस्त्यात चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. यावेळेस आश्वी खुर्दचे उप सरपंच सुनिल तुकाराम मांढरे आणि त्याचे मित्र उमेश गाडे वेळेस बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी दाखल झाले.