VIDEO : सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय राज्य सरकारला चपराक - बंटी भांगडीया - बंटी भांगडीया 12 आमदारांचे निलंबन
नागपूर :- भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे बारा आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने १२ आमदारांचे निलंबन करताना लोकशाही धोक्यात आणली होती. मात्र, न्यायालयाने हा निर्णय रद्द केल्याने सरकारला चपराक बसली असल्याची प्रतिक्रिया निलंबित आमदार बंटी भांगडीया यांनी दिली आहे. एक आमदार तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व विधानसभेत करतो या सरकारने 12 आमदारांचे निलंबन करून 36 लाख लोकांना लोकप्रतिनिधी पासून वंचित केले होते असा आरोप त्यांनी केला आहे. कोणत्याही आमदारांचं निलंबन करताना केवळ अधिवेशनाच्या कार्यकाळात पुरते नीलंबन करता येतं, मात्र तालिका सभापतींनी हुकूमशाही पद्धतीने बारा आमदारांना वर्षभरात करिता निलंबित करून लोकशाही धोक्यात आणली होती,मात्र न्यायालयाने राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडला आहे प्रतिक्रिया भाजप नेते बंटी भांगडिया यांनी दिली आहे.