BJP-NCP Workers Clash : विठ्ठल मंदिर परिसरात भाजप व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की - पंढरपुरात भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
पंढरपूर - भाजपचे (BJP) अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांविरोधात भाष्य केले होते. तुषार भोसले हे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळेस श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकमेकांना भिडले. त्यातून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसमोर झाल्याने वेगळीच चर्चा रंगली होती.